मोठेपणी कोण होणार????
मोठेपणी कोण होणार????
एक काळ होता, जेव्हा मुलांची दहावी बारावी झाली की कुठल्या स्ट्रीम ला ॲडमिशन घ्यायची?’ या प्रश्नाचं उत्तर दोनच पर्यायांमध्ये विभागलेलं होतं. डॉक्टर किंवा इंजिनिअर..... काळ बदलला तशी अनेक नवनवीन शाखांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होत गेले. अर्थातच, प्रत्येकाला ‘वेगळं’ काहीतरी करायची ओढ वाटू लागली आणि त्यातलं वेगळेपण हळूहळू लोप पावत गेलं. इतकं की आता वेगवेगळ्या शाखांमध्येच प्रचंड स्पर्धा निमाण झाली. सध्याच्या या तीव्र स्पर्धेच्या काळात विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सतावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे दहावी-बारावीनंतर कोणता करिअर ऑप्शन निवडावा? दिवसेंदिवस हा प्रश्न आणखी बिकट होत चाललेला आहे. शैक्षणिक संस्थांची आणि त्यांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, माहितीच्या महाजालाचा झालेला विस्फोट, संधींची विपुल उपलब्धता, वाढत्या अपेक्षा आणि अर्थातच उंचावलेलं राहणीमान अशी अनेक कारणं या प्रश्नाच्या मुळाशी आहेत. पण आता कारणांकडे जाण्यापेक्षा उत्तराकडे जाणं जास्त महत्वाचं आहे आणि हो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला एकदातरी ॲडमिशनप्लेक्सला भेट द्यावीच लागेल. पण नेमकं आहे तरी काय हे ॲडमिशनप्लेक्स?? आणि करिअरची निवड म्हणजे पुढच्या आयुष्याचं महाद्वारच.... इतका मोठा निर्णय असा, एका छताखाली बसून फायनल होईल? तुमच्या या सगळ्या शंका रास्त आहेत आणि म्हणूनच ॲडमिशनप्लेक्सबद्दल तुम्हाला थोडी माहिती घेणं गरजेचं आहे.
काय आहे ॲडमिशनप्लेक्स? ॲडमिशनप्लेक्स ही तुमच्या भावी व्यावसायिक जीवनाची गुरुकिल्ली आहे, तुमच्या अंगभूत गुणांना करिअरची वाट दाखवणारा गाईड आहे आणि आजच्या भाषेत सांगायचं तर तुमच्या उत्तुंग व्यावसायिक यशाचा पासवर्ड आहे. मुळात, ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला तुमच्या करिअर निवडीत मोलाची मदत करेल. हो, अगदी तुमच्या पात्रतेनुसार कॉलेज कुठलं तुम्ही निवडू शकता, कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची इथपासून ते तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या नानाविध स्कॉलरशिप्सपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक बाबतीत ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला अत्यंत मोलाची माहिती उपलब्ध करून देईल. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना समोर आलेले अनेक पर्याय बघून आपण गोंधळून जातो. अशा वेळी ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला तुमच्या सुयोग्य पर्याय निवडण्यात मदत करेल. जी गोष्ट कॉलेजची, तीच कोर्सेसची..... सीईटीच्या परीक्षेसाठी तुमच्यासमोर भरमसाठ विषयांचे पर्याय उपलब्ध असतात. त्यातले नेमके कुठले विषय निवडावेत, यासाठीही ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला साहाय्य करेल. ॲडमिशनप्लेक्स प्रोसेसमध्ये कोणकोणती कागदपत्रं लागतात, ती कधी, कुठं, कशी सबमिट करायची असतात, याचीही सांगोपांग माहिती तुम्हाला ॲडमिशनप्लेक्स मध्ये मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या करिअरसाठी अत्यंत गरजेचं असं तुमचं युनिक प्रोफाईल तयार करण्यात ॲडमिशनप्लेक्स तुम्हाला सर्वोपरी मदत करेल.
करिअर निवडणं हा आयुष्यातला अत्यंत नाजूक टप्पा असतो. त्या एका निर्णयावर आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. अर्थातच, इतका मोठा निर्णय घेताना भीती वाटणं, गोंधळ उडणं, टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. पण तीच खरी वेळ असते एखाद्या तज्ञ सल्लागाराकडून योग्य मार्गदर्शन घेण्याची!! तुमची हीच गरज ओळखून ॲडमिशनप्लेक्स तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. कारण, शेवटी स्वप्नं सत्यात उतरली की आयुष्याचा डायग्राम परफेक्ट जमतो आणि तुमच्या स्वप्नांचा परफेक्ट जमलेला डायग्राम म्हणजे ॲडमिशनप्लेक्स.... आजच भेट द्या आणि ॲडमिशनप्लेक्स साथीनं आपल्या करिअरचा राजमार्ग निश्चित करा.